WIFA’s Inter District Sub-Junior Girls Championship 2023-24 :- इशिता देबनाथने केलेल्या गोलच्या जोरावर पुणे संघाने मुंबई संघाला पराभूत करताना जळगाव येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आंतरजिल्हा ज्युनियर मुली फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना मध्यंतरापर्यंत एकही गोल करता आला नाही. मात्र मध्यंतरानंतर पुण्याच्या इशिता देबनाथने मिळालेल्या संधीचा फायदा घेताना मैदानी गोल करत पुणे संघाचे खाते उघडले.
Women’s Jr. Asia Cup 2024 : टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, थायलंडचा केला दारूण पराभव…
पुणे संघाने 36 व्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यानंतर देखील मुंबई संघाने अनेकदा प्रयत्न करून देखील पुणे संघाच्या बचावपटूंना चकविण्यात मुंबईच्या खेळाडूंना अपयश आले.