लंडन : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार क्लाइव्ह लाॅइड यांना ‘नाइटहूड’ किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघटनेने यासंबंधीचे ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ARISE SIR CLIVE
Congratulations to West Indies Great Clive Lloyd who is set to receive a Knighthood in the New Year for his outstanding service to Cricket 👏👏 pic.twitter.com/bFRO9KVaOR
— Windies Cricket (@windiescricket) December 27, 2019
या किताबानंतर लाॅइड यांना ‘सर’ या उपाधीसह संबोधित केले जाईल. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स, एव्हर्टन वीक्स आणि व्हिव रिचर्डस या खेळाडूंना या किताबाने गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, क्लाइव्ह लाॅइड यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने १९७५ आणि १९७९ चे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.