तुम्ही जर वायफाय किंवा मोबाईल हाॅटस्पाॅट चा वापर करत असाल आणि तुम्हाला वाटतय की अन्य व्यक्ती इंटरनेट डेटा वापरू पाहत आहे तर असे काही अॅप आहेत जे अशा यूझर्सला डेटा चोरी करण्यापासून रोखू शकतात.
(1)वाय-फाय इंस्पेक्टर अॅप
4.3 रेटिंग असणारे हे अॅप फ्री मध्ये उपलब्ध आहे. या अॅपव्दारे तुम्हाला तुमच्या वाय-फाय राउटर किंवा हाॅटस्पाॅट ला किती यूझर्सनी आपले डिव्हाईस कनेक्ट केले आहे. त्याबरोबरच तुम्हाला त्या डिव्हाईसचे नाव आणि मॅक अॅड्रेस सुध्दा दिसू शकेल. अॅप डेव्हलपरने हा दावा केला आहे की, हे अॅप्लीकेशन सर्व माहिती 30 सेंकदातच तुम्हाला सांगू शकेल. हे अॅप अॅन्ड्राईड 2.3 जिंजरब्रेड आॅपरेटिंग सिस्टिम किंवा त्यापेक्षा अधिकच्या व्हर्जनवर काम करू शकते. हे अॅप प्ले स्टोरवर वायफाय इंस्पेक्टर (Wifi Inspector)नावाने उपलब्ध आहे.
(2) वाय-फाय किल अॅप
वाय-फाय किल अॅप्लीकेशन फक्त दुसऱ्या यूझर्सना वाय-फाय किवा हाॅटस्पाॅटला कनेक्ट होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. तसेच तुम्ही इतर पब्लिक वाय-फाय चा वापर करत असाल तर या अॅपव्दारे तुम्ही वायफाय नेटवर्कचे स्पीड वाढविण्यासंबंधी मदत करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे अॅप गूगल प्लेस्टोरवर वर Free Wifi Kill reference या नावाने उपलब्ध आहे. पब्लिक वाय-फाय नेटवर्कमध्ये सुरक्षा संबंधी अनेक त्रूटी असतात. त्यामुळे डिव्हाईसमध्ये वायरस येण्याचा जास्त धोका असतो. जर तुमच्या जवळपास काही यूझर्स पब्लिक वाय-फाय वापरत असतील तर हे अॅप तुमच्या डिव्हाईसमध्ये असेल तर इतर यूझर्सना डेटा चोरी करण्यापासून रोखण्याचे काम हे अॅप करते.
(3) फिंग नेटवर्क टूल्स अॅप
हे अॅप गूगल प्ले-स्टोरवर Fing – Network Tools या नावाने उपलब्ध आहे. हे अॅप स्मार्ट फोन किंवा टॅबलेटसमध्ये इनस्टाॅल केल्यानंतर यूजर्सला त्याच्या राउटरला किती डिव्हाईस कनेक्टेड आहेत याबदल माहिती दाखवते. फिंग अॅप मध्ये मॅनीफेक्चर, मॅक आणि डिव्हाईसचा आयकाॅनही दिसतो. तसेच डिव्हाईसची हिस्ट्री सुध्दा तुम्ही पाहू शकता. तसेच कोणतं डिव्हाईस कधी वाय-फाय राउटरला कनेक्ट झालं होतं यासंबंधीसुध्दा माहिती देण्याचं काम हे अॅप करतं.