Badlapur । बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक शाळेबाहेर जमले आहेत. शाळा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
याच घटनेवर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. कोणतेही राजकारण न करता आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी’ असे ते म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले,’अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. आपल्याकडे अशी पद्धत सुरु झालीय की अशा घटनांचे राजकारण केलं जात आहे. लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. असं म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. देशासह कुठल्याही राज्यात अशात प्रकारच्या घटना घडू नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला वेळ लागला. एखाद्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या घटनेसाठी ते गुन्हेगार जबाबदार असतात तसेच त्यावर न्यायनिवाडा करुन शिक्षा देण्यात दिरंगाई करणारे देखील जबाबदार धरले पाहिजेत.’
पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘मला असं कळलं आहे की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबधित होती. याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का? कुठेही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे’ अस म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.