काही वेळापूर्वी बीसीसीआयकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तसेच इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेसाठीदेखील टीमची घोषणा करण्यात आली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे.
मोहम्मद सिराजला डावलणे आश्चर्यकारक
मोहम्मद सिराज वनडे वर्ल्डकप 2023 आणि टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळला होता.तसेच त्याची कामगिरीदेखील चांगली होती. तरीदेखील त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कमिटीच्या या निर्णयामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र मोहम्मद सिराज या दोन्ही संघातून का डावलण्यात आले याचा खुलासा कर्णधार रोहित शर्माने केला आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
मोहम्मद सिराजची संघामध्ये निवड का झाली नाही हे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. ‘सिराज नव्या चेंडूने टीमसाठी गोलंदाजी करत नाही आणि जेव्हा चेंडू जुना होतो तेव्हा तो तितक्या प्रभावीपणे गोलंदाजी करत नाही. आम्हाला अशा गोलंदाजाची गरज आहे की तो नव्या आणि जुन्या चेंडूने प्रभावी ठरू शकेल.’, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
अर्शदीपला संघात स्थान
जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. त्याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. मात्र बुमराह संघात नसेल तर त्याच्या जागी जबाबदारी घेईल असा गोलंदाज संघाला हवा होता त्यामुळे आम्ही अर्शदीप सिंगची निवड केली आहे. आम्हाला असा गोलंदाज हवा की जो फ्रंट आणि बॅकला गोलंदाजी करेल. अर्शदीप जास्त वनडे खेळला नाही. पण व्हाईट चेंडूने चांगली कमगिरी करत आहे. म्हणून त्याला अनुभव नसला तरी आम्हाला त्याची चिंता नाही असे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत , जडेजा, हर्षित राणा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).