मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सुशांत सिंगच्या संदर्भात त्याचे नातेवाईक आणि मित्र वेगवेगळी भूमिका मांडून हा गोंधळ अधिकच वाढवत आहेत.
यातच, सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचे सत्य समोर आले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. बिहार सरकारच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे हा प्रस्ताव पाठवण्याची शिफारस केंद्राने मान्य केली असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यातच आता या सध्या सुशांतचं मृतदेह घेऊन जाणारा रुग्णवाहिका चालक चर्चेत आला आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार,’ सुशांतने आत्महत्या केल्यानंतर ज्या रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह रुग्णालयात आला त्या रुग्णवाहिका चालकास धमकीचे अनेक फोन येत.या चालकाचे नाव विशाल बंदगार आहे. सुशांतचे काही चाहते विशालला सतत फोन करुन धमकी देत आहेत. रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा आवळून त्याचा खून केल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर दिवसातून असे धमकीचे अनेक फोन येत असून ते अर्वाच्च भाषेत बोलतात असंही, विशालने सांगितलं आहे. विशाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा विचार करत आहेत.