नगर -राहुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिक आजही विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत आहेत. माझ्या विरोधात निवडून आलेले उमेदवाराला राज्य ऊर्जामंत्रीपद मिळाले. तरी ही त्यांच्याकडून प्रश्न सोडले जात नाही. त्यांनी मंत्री पद हे फक्त नावालाच घेतले आहे का असा ही प्रश्न उपस्थित होत असल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे.
नगर तालुक्यातील कापूरवाडी, बारा बाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकऱ्यांना जिल्हा बॅकेच्या माध्यमातून खेळते भांडवलाचे चेक वाटप करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, रघुनाथ लोंढे, अभिलाष धिगे, संतोष म्हस्के, मनोज कोतकर, रावसाहेब साठे, बाबासाहेब जाधव, दीपक लांडगे, सुरेश सुंबे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, प्रंशात गहिले, विलास शिंदे, कानिफनाथ कासार, राजू भिंगारदिवे, रंगनाथ कर्डिले, दत्ता तापकिरे, रवी कर्डिले, मच्छिंद्र दुसुंगे, जगन्नाथ कराळे, शंकर पवार, मिनीनाथ दुसुंगे, संभाजी भगत, मारुती कचरे, बापूसाहेब शिंदे, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड, गुलाबराव लांडगे
राहुल पानसरे, राम पानमळकर, संजय धोतरे, संतोष पालवे, विजय खोमणे, माणिक वाघस्कर, मज्जू शेख, अय्युब पठाण, अजय गारदे, किरण दळवी आदी उपस्थित होते. सुंबे म्हणाले, संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना योग्यवेळी बॅकेच्या माध्यमातून मदत घेऊन येण्याचे काम कर्डिले यांनी केले.