हिंदुंवरील अत्याचारवर सरकार बोलत का नाही, बांगलादेशलाही घाबरणार का ? भाजप खासदाराचाच मोदींना सवाल

नवी दिल्ली – बांगलादेशात दुर्गापुजा मंडपांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या प्रकरणी पश्‍चिम बंगालमधील अनेक क्षेत्रातील नामवंतांनी बांगलादेश सरकारला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करा असे आवाहन केले आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकार यावर अद्याप निषेधही नोंदविला नाही. यावरून भाजप खासदाराने मोदी सरकारला खरमरीत सवाल केला आहे.

बांग्लादेशात हिंदूंची घरे जाळण्यात आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मात्र केंद्रातील मंत्र्यांने यावर निषेध देखील व्यक्त केलेला नाही. याकडे भाजपच्याच खासदाराने लक्ष्य वेधलं असून सरकारला प्रश्न विचारला आहे. आता या पुढे आपण मालदिवला देखील घाबरणार का? असा खोचक सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे.

बांग्लादेशातील हिंदूंच्या ‘नरसंहारावर’ भाजप सरकार काही का बोलत नाही? ते बांग्लादेशला घाबरत आहे का? लडाखमध्ये चीनच्या आक्रमणाच्या भीतीनंतर, तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी इच्छितो. आता या पुढे आपण मालदिवलाही घाबरणार का? असं ट्विट स्वामी यांनी केलं.


बांग्लादेशात दुर्गा पूजेवळी झालेल्या वादानंतर हल्लेखोरांनी हिंदूंची 20 घरे जाळली. अजूनही बांग्लादेशच्या विविध भागात हिंदूंच्या विरोधात हिंसाचार सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.