पाचगणी : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावली सोसायटी मतदार संघाची निवडणुक हाय होल्टेज झाली. यानिवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी एक मताने पराभुत करुन जावली मध्ये इतिहास रचला.
मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरसुद्धा या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना मदत करा असा प्रचंड दबाव राज्यातील मोठ-मोठ्या नेत्यांचा असताना देखील शिवेंद्रराजे भोसले ज्ञानदेव राजणे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमीका का? घेतली यांचा गौप्सस्पोट करताना आबेघर येथील शेतकरी मेळाव्याला म्हणाले.
‘माझी भुमीका एकच होती जे माझ्याबरोबर गत १० ते १५ वर्ष माझ्या राजकारणामध्ये कोणताही प्रसंग आला, जे माझ्याबरेबर राहीले त्यांना मी सोडुन द्यायच आणि ज्यानी मला वेळोवेळी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मी साथ द्यायची हे कुठल्या तत्वाचं राजकारण आहे.’ हे कोणत्या तत्वाचं बसत.
ज्याच माझ्यावर प्रामाणिकपणे प्रेम आहे त्या माझ्या कार्यकर्त्या म्हणा किंवा मित्र म्हणा त्याच्याबरेबर राहण्याची भुमीका घेतली. जे पुढे काय होईल ते होईल पुढे संघर्ष होईल की आणखी काय किंवा राजकीय दबाव वाढला तरीही भुमीका बदलायची नाही. म्हणुन ज्ञानदेव राजणे याच्याबरोबर प्रचंड राजकीय दबावात ठाम राहीलो.
जावलीतील २५ मतदारांचा आशिर्वाद वसंतराव मानकुमरे यांची साथ म्हणुन आज ज्ञानदेव राजणे याच्यावर गुलाल पडला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी घरातील मुलगा ज्ञानदेव रांजणे जिल्हाबॅकेत जाऊन पोहचला ही महत्वपुर्ण बाब असल्याचे शेतकरी मेळाव्याला बोलताना आ शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केल. यावेळी जावली तालुक्यांतील मान्यवर उपस्थित होते.