राष्ट्रपती राजवटीची एवढी घाई का..?

मुंबई: राज्यातील सत्तेचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. सरकार स्थापन होणार कि राष्ट्रपती राजवट लागू होणार हे आज रात्री समजणार आहे. भाजप, सेनेनंतर राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना आज राष्ट्रे ८:३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपतींना अहवाल पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्यास भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तसेच काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असून त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांकडे मुदत वाढून मागितली होती. परंतु राज्यपालांनी ती मागणी नाकारली आहे.

जर एखादा पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यास मुदत वाढ मागत असेल तर ती देण्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एवढी घाई का केली जातेय असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

तसेच तुम्ही सत्तेत सहभगी होणार का? असे विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, सहभागी होणार, की बाहेरून पाठिंबा देनार या बद्दल पक्ष श्रेष्टी लवकरच भूमिका जाहीर करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.