इंदूर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणारे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत मौन बाळगल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिग्विजय सिंह म्हणाले, या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असल्याने केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे. ट्विटवर छोट्या-छोट्या बाबींवरही विधाने करणारे पंतप्रधान कुस्तीपटूंच्या आंदोलनावर गप्प का आहेत?, असा सवाल त्यांनी केला.
महिला कुस्तीपटूंनी उपस्थित केलेला मुद्दा आणि त्यांच्या आंदोलनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा किती डागाळली आहे, याची कल्पनाही करता येणार नाही, असेही ते म्हणाले.