रि-डेव्हलपमेंट का गरजेची? (भाग-१)

अनेक ठिकाणी जुन्या इमारती पाडून नव्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जुन्या इमारतीऐवजी न्यू ब्रॅंड नवीन इमारत उभारण्याचे अनेक फायदे आहेत. रि-डेव्हलपमेंटचा सर्वात फायदा म्हणजे नवीन इमारतीत नवीन डिझाइन किंवा ले-आऊटचे घर तयार केले जाते.

जुन्या इमारतीचे मेकओव्हर किंवा रिडेव्हलपमेंट करणे ही बाब नवीन नाही. अनेक ठिकाणी जुन्या इमारती पाडून नव्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जुन्या इमारतीऐवजी न्यू ब्रॅंड नवीन इमारत उभारण्याचे अनेक फायदे आहेत. यातून नव्या रंगात, रूपात आणि रचनेत इमारत उभी राहते आणि दुसरे म्हणजे अधिक नागरिकांसाठी जादा जागा उपलब्ध होऊ शकते. नव्या बांधकामात एफएसआय मिळत असल्याने रहिवाशांना अतिरिक्त जागेचा लाभही मिळू शकतो. अर्थात रि-डेव्हलपमेंटचा निर्णय घेताना हौसिंग सोसायटीने रहिवाशांना विश्‍वासात घ्यायला हवे आणि सर्वमान्य योजना राबवायला हवी. काहीवेळा घराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना अन्य ठिकाणी राहण्यासाठी जावे लागते. अशावेळी विकासकाकडून भाड्याची सोय केली जाते. म्हणून रि-डेव्हलपमेंट योजनेची योग्य रितीने अंमलबजावणी करायला हवी, जेणेकरून रहिवाशांना चांगला लाभ पदरात पडेल.

निर्मितीची गुणवत्ता:
एखाद्या जुन्या पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या इमारतीत राहिल्यानंतर आपल्याला भूकंपविरोधी इमारतीत राहण्याची संधी मिळू शकते. सर्वसाधारणपणे री-डेव्हलपमेंटमध्ये वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य हे चांगल्या दर्जाचे असते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे सोसायटीत आगामी पंधरा ते वीस वर्षे किरकोळ डागडुजी करण्याची गरज भासत नाही. अनेक वर्षांपासून सतत दुरुस्ती करण्यात खर्च घालवण्यापेक्षा नव्याने इमारतीची उभारणी केलेली कधीही उत्तम. रि-डेव्हलपमेंट करण्यासाठी विकासक आणि सोसायटी यांच्यात करार होतो. या कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही तसेच वेळेत ताबा मिळतो की नाही, यावरही सोसायटीच्या सदस्यांना देखरेख ठेवावी लागते. बांधकामाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही.

उत्पन्नाचे साधन:
री-डेव्हलपमेंटमध्ये चांगला फंड जमा होतो. यातून इमारतीत राहणाऱ्या सदस्यांच्या घराच्या बांधकामाचा खर्च उचलता येतो. एवढेच नाही तर नवीन इमारतीत वाढणाऱ्या मेंटनन्स कॉस्टचा भार देखील काही प्रमाणात हलका होऊ शकतो. जमा होणारा पैसा हा प्रत्येक सदस्याच्या इच्छेप्रमाणे खर्चही करता येतो.

रि-डेव्हलपमेंट का गरजेची? (भाग-२)

लिफ्टचा लाभ:
बहुतांश जुन्या इमारतीत लिफ्टची सुविधा नसते. जुन्या इमारती या चार ते पाच मजल्यापर्यंतच असतात. मात्र, नव्या इमारती या दहा मजल्यांपेक्षा अधिक असू शकतात. अशा स्थितीत लिफ्ट असणे अनिवार्य असते. म्हणूनच नव्याने उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीत लिफ्टची सुविधा केली जाते. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना लिफ्टचा लाभ होऊ शकतो. विशेषत: ज्येष्ठ आणि मुलांना त्याचा फायदा मिळतो.

– विधिषा देशपांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.