रि-डेव्हलपमेंट का गरजेची? (भाग-२)

अनेक ठिकाणी जुन्या इमारती पाडून नव्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जुन्या इमारतीऐवजी न्यू ब्रॅंड नवीन इमारत उभारण्याचे अनेक फायदे आहेत. री-डेव्हलपमेंटचा सर्वात फायदा म्हणजे नवीन इमारतीत नवीन डिझाइन किंवा ले-आऊटचे घर तयार केले जाते.

रि-डेव्हलपमेंट का गरजेची? (भाग-१)

चांगली सुरक्षा:
नवीन इमारतीत आधुनिक सुविधांबरोबरच सुरक्षेचा स्तरही वाढतो. आजकाल सुरक्षेसाठी आधुनिक उपकरणांची रचना नव्या इमारतीत केली जाते. सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरकॉम सर्व्हिस, आगविरोधी प्रतिबंधक योजना, अलार्म, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती आदींची सुविधा नव्या इमारतीच्या माध्यमातून उपलब्ध होते.

पार्किंगची सुविधा:
नवीन डिझाइनने तयार होणाऱ्या निवासी योजनांत पार्किंगची देखील चांगली सुविधा असते. विशेषत: भूमिगत पार्किंगची रचना केली जाते. अशा ठिकाणी सोसायटीच्या प्रत्येक सदस्यासाठी वेगळा पार्किंग स्लॉट तयार केला जातो. जुन्या इमारतीत गाडी लावण्यासाठी पुरेशी जागा सोडलेली नसते. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांची रसमिसळ होते. परिणामी गाडी लावण्यावरून नागरिकात वादही होतात. अशावेळी रि-डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र पार्किंग मिळते.

व्यावसायिक दृष्टिकोन :
इमारतीची पुनर्रचना आणि फेरबांधणीसाठी चांगला विकासक असणे गरजेचे आहे. यासाठी चांगल्या आर्किटेक्‍टची मदत घ्या तसेच प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सेवा घ्या. रि- डेव्हलपमेंटसाठी भावनिकपेक्षा व्यावासयिक दृष्टिकोन बाळगणे फायद्याचे ठरते.

चांगली डिझाइन:
री-डेव्हलपमेंटचा सर्वात फायदा म्हणजे नवीन इमारतीत नवीन डिझाइन किंवा ले-आऊटचे घर तयार केले जाते. त्यात जागा मोठी असते. खोल्यांची संख्याही वाढू शकते. बाथरूम, लिव्हिंग रूम, किचन, ड्राय बाल्कनी, टेरेस आदींसाठी रचना करता येते. जुन्या इमारतीच्या तुलनेत नव्या इमारतीत अधिकाधिक सुविधा रहिवाशांना मिळू शकतात.

बाह्यरूप देखील आकर्षक:
नव्या इमारतीसाठी नवीन डिझाइन तयार केली जाते. अंतर्गत आणि बाह्यअंतर्गत रचना आकर्षक पद्धतीने साकारली जाते. इमारतीचे प्रवेशद्वार, रहिवाशांसाठी पार्किंग, पाहुण्यांसाठी वेगळी पार्किंग, लहान बाग, मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, ज्येष्ठांसाठी वेगळी पायवाट, क्‍लब हाऊस, मंदिर आदी गोष्टींची व्यवस्था केल्याने नवीन इमारत सुसज्ज वाटू लागते.

– विधिषा देशपांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.