आमदार खरेदी करून सत्ता मिळवणे हीच का मोदींची लोकशाही? -केजरीवाल

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या एका केंद्रीय मंत्र्याने आम आदमी पक्षाचे चौदा आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. त्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधकांचेआमदार फोडून किंवा विकत घेऊन सत्ता हस्तगत करणे हीच मोदींची लोकशाही आहे काय? आम आदमी पक्षाचे आमदार फोडणे ही इतकी सोपी बाब नाही हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी हे विरोधकांचे आमदार फोडण्याची भाषा करीत असतील तर त्यांच्याकडे आमदार फोडण्यासाठीचे पैसे कोठून येतात? आम आदमी पक्षाचे आमदार पैसे देऊन फोडणे हे इतके सोपे काम तुम्हाला वाटते काय? असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपचे नेते व क्रेंदीय मंत्री विजय गोयल यांनी आपण आम आदमी पक्षाच्या चौदा आमदाराच्या संपर्कात आहोत असे विधान केले आहे. हे आमदार आम आदमी पक्षाच्या कामकाज पद्धतीला कंटाळले असून त्यामुळेच ते पक्ष सोडून जाण्यास तयार आहेत असे विजय गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत नमूद केले होते त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी ही विधाने केली आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अलिकडेच असा आरोप केला आहे की आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी त्यांनी प्रत्येकी दहा कोटी रूपयांची ऑफर दिली गेली आहे. भाजपकडे आता विकासाचा कोणताही मुद्दा शिल्लक नसल्याने ते आता आमच्या आमदारांना पैसे देऊन फोडण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.