‘मॅम बिजली गई इधर पर फ्युज आपका क्यूँ उड रहा हैं’

कुणाल कामराने उडवली कंगनाची खिल्ली

मुंबई  – मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं सगळीकडे एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकारानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करुन नाराजी व्यक्त केली.

 

कुणाल कामरा-संजय राऊत यांच्यातील ‘जेसीबी’ भेटीवरून कंगना संतापली

 

याबरोबर  शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना टोला लगावला आहे. मात्र, तिच्या ट्विटनंतर कुणाल कामरानेदेखील कंगनाची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं.“बिजली गई इधर पर फ्युज आपका क्यूँ उड रहा हैं”, असं कुणाल कामरा म्हणाला आहे.

दरम्यान,  कंगनाने ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा एक फोटो शेअर केला आहे. “भलेही माझे प्रचंड मोठा प्रमाणात भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या  खच्चीकरण करण्यात आलं. मात्र   माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होतंय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.