इजिप्त. पिराॅमिडची ओळख असेलेला देश. आजही इजिप्तचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर चटकन उभ राहतं ते म्हणजे इथलं पिरॅामिड.. इजिप्तमध्ये तब्बल ११० पिरॅामिड्स आहेत. यातील ८० पिरॅामिड्स एकट्या गिझा सिटीमध्ये आहेत. या पिरॅामिडला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. त्रिकोणी आकारात असलेली भलीमोठी पिरॅामिड्स लक्ष वेधून घेतात. ही पिरॅमिड्स का तयार झाला यामागचा इतिहास काय आहे आणि सध्या यावर आधारलेलं टुरिझम कसं आहे, हे आपण जाणून घेणार आहोत…
थोडक्यात इतिहास
गिझा येथे एकूण ९ पिरॅामिड्स आहेत. यातील ३ पिरॅामिड्स आकाराने मोठे आणि ६ पिरॅमिड्स आकाराने लहान आहेत. तिथल्या राजांना लोकं देव मानत होती. त्यांच्या डेड बॅाडीज या पिरॅामिड्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आता त्यांच्या बॅाडीज येथून हलवून इथल्या एका संग्रालयात ठेवण्यात आल्या आहेत. कित्येक वर्षांपासून या बॅाडीच तशाच प्रीझर्व्ह करून ठेवण्यात आल्या आहेत. इथला संपूर्ण परिसर वाळवंटाने वेढलेला आहे. नाईल नदी तिथून याच भागातून जाते, जीची ओळख सर्वांत मोठी नदी म्हणून केली जाते.
अनोख्या दगडांचा वापर
पिरॅमिडसाठी एकमेकांवर दगडी रचण्यात आली. यातील एक दगड लाईम स्टोन नावाने ओळखले जाते. या पिरॅमिड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दगडांचा वापर करण्यात आला होता. ताजमहाल तयार झाल्यानंतर तो तयार करणाऱ्या कामगारांचे हात कापण्यात आल्याची अख्यायिका सांगितली जाते. तसच हे पिरॅमिड्स तयार झाल्यानंतर कामगारांना मारून टाकण्यात आलं होतं, अशी अख्यायिका सांगितली जाते. या पिरॅमिड्सच्या समोरच त्यांची कबर करून त्यांना जमीनीत गाडण्यात आले आणि तिथे चबुतरा करण्यात आला असे सांगितले जाते.
फसवण्यासाठीची क्लृप्ती
त्रिकोण आकारचे असलेले या पिरॅमिड्सची अनेक वैशिट्ये सांगितली जातात. या पिरॅमिड्सचा दरवाजा बेस लेव्हल तयार करण्यात आला आहे. लांबून पाहल्यानंतर त्रिकोणी आकारावर एक उभा छेद आहे, त्याला पाहिल्यानंतर हिच त्याच्या आतमध्ये जाण्याची एन्ट्री असावी असे वाटते. पण तसे नसून आक्रमण करणाऱ्यांना फसवण्यासाठी ते तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. दुसर वैशिट्ये म्हणजे याच पिरॅमिडवर सिंहाची आकृती आहे. एका दगडापासून कोरीव काम करून ती तयार करण्यात आली आहे.
झाडापासून कागद
इजिप्तमध्ये आर्ट कल्चर देखील मोठ्या प्रमाणात आहे. एक प्रसिद्ध झाड आहे, त्या झाडापासून कागद तयार करून त्यावर पेटिंग केली जाते, त्यानंतर त्याची विक्री केली जाते. पर्यटकांकडून याला मोठी मागणी असते. तसेच या कागदावरील पेंटिंगला इथल्या बाजारात मोठी किंमत आहे. नॅशनल पेपर गॅलॅक्सी आर्ट पेटिंग्ज इथे या कागदावरील पेटिंग्जची विक्री केली जाते.
अशी प्रक्रिया करून केला जातो कागद तयार
झाडाच्या बुंध्याचा भाग तोडून आणला जातो. त्याला पाण्यात रात्रभर भिजवले जाते. चाकूने त्याच्यावरील हिरवी साल काढली जाते. त्यानंतर पांढरा बुंधा राहतो. बुंध्याला लाटण्याने लाटतात. त्याच्या पट्ट्या तयार करतात. त्यानंतर या पट्ट्यांना प्रेस मशिनमध्ये दाबून ठेवलं जात. त्यानंतर कागद तयार होतो. हा कागद वजनाला हलक्या स्वरुपाचा असतो. त्यावर त्यांच्या राजांचे किंवा इजिप्त कँलंडरचे पेटिंग काढून विकले जाते. याला मोठी मागणी पर्यटकांकडून केली जाते.
१२ किलोमीटरचा परिघ
टुरिझम चांगल्या प्रकारे इजिप्तमध्ये स्थिरावलेलं आहे. इजिप्तची राजधानी कियरो आहे. तिथून बॅाय रोड अर्ध्या तासांच्या अंतरावर गिझा सिटी आहे. या सिटीमध्ये हे पिरॅमिड्स पाहिला मिळतात. इथं एन्ट्री करण्यासाठी १२ डॅालर द्यावे लागतात. या पिरॅमिडच्या काही भागात तुम्ही जाऊ शकत नाही. कारण या भागात फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. १२ किलोमीटरच्या परिघात हे पिरॅमिड्स आहेत.
पर्यटनासाठी या गोष्टींचा वापर करू शकता
सगळ्यात जास्त पर्यटक या देशात पर्यटनासाठी येतात. इथं आल्यानंतर तुम्ही टांगा, उंट यांचा वापर करून या परिसरात फिरू शकता. किंवा मग पायी देखील फिरू शकता. या पिरॅमिडची आणि इथल्या इतिहासाची माहिती या ठिकाणचे गाईड देतात. त्यामुळे पर्यटनासोबतच इतिहासाची माहिती मिळते. मोकळ्या हवेत इथला प्रदेश विस्तारला आहे, हवेत फरक जाणवतो.
सध्या मात्र पडझड
आपल्यासारखं प्रदुषण इथ नाही. रस्ते देखील चांगल्या पद्धतीने तयार केलेले आहेत. खासकरून इथल्या जुन्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. सध्याच्या घडीला मात्र, मोठ्या प्रमाणावर या पिरॅमिड्सची पडझड झाल्याचे पाहिला मिळते. मोठ्या पिरॅमिड्स म्हणजे राजा आणि छोटे पिरॅमिड्स म्हणजे राणी अशी देखील एक अख्यायिका सांगितली जाते. कुंस, खुला अशी काही राजघराण्यांची नावे आहेत.
(सदर माहिती ही नेट आणि नेव्हीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून घेण्यात आली आहे. यामुळे काही गोष्टींमध्ये फरक असू शकतो)