देशभरात आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. विसर्जनाच्या दिवशी, गणेशभक्त नाचत, गाजत आणि भावुक होऊन बापाला निरोप देतात. अशात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. दहा दिवसांच्या पूजेनंतर श्रींची मूर्ती पाण्यात का विसर्जित केली जाते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
पौराणिक मान्यतेनुसार श्री वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग दहा दिवस बाप्पांना महाभारत कथा सांगितली होती. दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समजले की दहा दिवसांच्या मेहनतीनंतर गणेशजींचे तापमान खूप वाढले आहे. अशा स्थितीत वेद व्यासजींनी गणेशजींना ताबडतोब जवळच्या तलावात नेऊन थंड पाण्याने आंघोळ घातली. त्यामुळेच चतुर्दशीला गणेशाची प्रतिष्ठापना करून थंडावा दिला जातो, असे म्हणतात.
गणेश चतुर्दशी आणि विसर्जनाचा महिमा
भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरू होतो. चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि चतुर्दशी तिथीला विसर्जन केले जाते. या नऊ दिवसांना गणेश नवरात्री म्हणतात. असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. स्थापनेपेक्षा विसर्जन अधिक गौरवास्पद आहे. या दिवशी अनंत शुभ फळ मिळू शकतात. म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात.