नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यास मान्यता दिली. यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनपीआर आणि एनआरसीवर केलेल्या विधानावर टीका केली आहे.
Asaduddin Owaisi, AIMIM: Why is Home Minister misleading the nation? In Parliament he said ‘Owaisi ji NRC will be implemented in the whole country’. Amit Shah sahab, as long as the sun keeps rising from the east we will keep telling the truth. NPR is the first step towards NRC. https://t.co/toAQU3yjV3 pic.twitter.com/8vgAqne8Ce
— ANI (@ANI) December 24, 2019
असदुद्दीन ओवैसी यांनी शहा यांच्या विधानावर विरोध दर्शवत असून त्यांनी माध्यमांना सांगितले की,’गृहमंत्री देशाची दिशाभूल का करत आहे ? अमित शहा यांनी संसदेत म्हंटले होते,’ एनआरसी संपूर्ण देशात लागू होणार, मात्र अमित शाह साहब जो पर्यंत सूर्य पूर्वेकडून उगवत राहील आम्ही तो पर्यंत खरेच बोलू असं म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली.
तत्पूर्वी,’ केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यास मान्यता दिली. यावर विरोधकांनी केंद्र सरकाला लक्ष केले आहे. यावर विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत अमित शाह यांनी एनपीआर आणि एनआरसी वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोघांची प्रक्रिया वेगळी आहे. दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटले होते.