मुंबई – बॉलिवूडची सर्वात ग्लॅमर्स अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या ग्लॅमर्स लुकसाठी चर्चेत असते. “चमेली’, “अशोका’ आणि “जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील लुक आणि हटके अंदाजामुळे ती ओळखली जाते. तसेच नेहमीच सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक आणि अभिनयला युजर्स दाद देत असतात.
मात्र यावेळी सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक चर्चा होत नसून करीना कपूरच्या नो मेकअप लुक चर्चेत आहे. या सिनेमातून करीनाचा मुलगा तैमूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या पुढे यायला लागल्या आहेत. अशातच नेहमी ग्लॅमर्स लुकमध्ये दिसणाऱ्या करीना कपूरच्या नो मेकअप लुकच्या चर्चा सध्या सोशल माध्यामध्ये सुरू आहे. इन्स्टाग्रामवर ‘द रिअल करिना कपूर’ नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. करिना यात नो मेकअप लूकमध्ये आहे. तिच्या बोटात अंगठी आहे आणि नखांवर काळी नेलपॉलिश लावलेली आहे. तूर्तास या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. दरम्यान, करीना कपूरच्या “गुड न्यूज’ या सिनेमाबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. या सिनेमातून करीनाचा मुलगा तैमूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या पुढे यायला लागल्या आहेत.