प्राप्तिकर विवरण का भरायचे? (भाग-२)

प्राप्तिकर विवरण का भरायचे? (भाग-१)

आपल्या पत्त्याचा पुरावा
प्राप्तिकर विवरणाच्या प्रतीचा वापर हा पुरावा म्हणूनही उपयुक्त ठरू शकतो. सर्व सरकारी विभागांना हा पुरावा मान्य असतो. जर आपण आधार किंवा पासपोर्टच्या अर्जासाठी आयडी प्रुफ म्हणून त्याचा वापर करू शकता. अनेक देशात व्हिसा देण्यापूर्वी दोन तीन वर्षाचे रिटर्न पाहिले जाते. आयटीआर नसल्यास व्हिसाही नाकारला जावू शकतो. आयटीआर भरला असेल तर व्हिसा सहजपणे मिळतो.

मोठ्या विम्यासाठी आवश्‍यक
आपण 50 लाख ते 1 कोटीपर्यंतचा टर्म इन्शूरन्स घेत असाल तर प्राप्तिकर रिटर्नर्ची कॉपी विमा कंपनी मागू शकते. यातून आपले वार्षिक उत्पन्न कळण्यास हातभार लागू शकतो. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी देखील रिटर्नची मागणी केली जाते. रिटर्न पाहून आर्थिक स्थितीची पडताळणी केली जाते.

पैशाचे मोठे व्यवहार
प्राप्तीकर विवरण आपली आर्थिक स्थिती मजबूत करते. अशा स्थितीत आपण प्रॉपर्टी विक्री खरेदी करणे किंवा विकणे, बॅंकेत मुदत ठेवी ठेवणे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक यासारखे मोठे व्यवहार करत असाल आणि प्राप्तीकर विवरण भरत असाल तर आपल्याला प्राप्तिकर खात्याची नोटीस येणार नाही.

– विश्‍वास सरदेशमुख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.