मुंबई – बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर चित्रपट,फॅशन आणि इंडस्ट्रीमध्ये आलिशान पार्ट्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकतच करणने एका जबरदस्त पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील सर्वच दिग्गज मंडळी उपस्थित होती. या पार्टीतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सोहेल खानची आधीची पत्नी दिसत आहे.
करण जोहरने आपल्या घरी दिलेल्या या पार्टीला मनीष मल्होत्रा,अनन्या पांडे,शाहरुखचा मुलगा आर्यन खान तसेच सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह यासारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. याच पार्टीतील सीमा सजदेहचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीमा पार्टीतून घरी निघण्यासाठी करण जोहरच्या घराबाहेर आली आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. यावरूनच आता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सीमाला साधं नीट उभही राहता येत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तिच्या बोलण्यावरून ती टल्ली वाटत असल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एवढी कशाला प्यायची ? असा सवाल एका युजरने कमेंट करून विचारला आहे. तर दुसऱ्याने हिला जास्त चढली असल्याचे म्हंटले आहे. काही महिन्यांपूर्वीच सोहेल सीमा विभक्त झाले होते त्यांना २ मुले देखील आहेत.