‘मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाही ? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

मुंबई –  मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. अशी थेट टीका सतत विरोधी पक्षांकडून होत आहे. राज्यात करोना तांडव करत आहे.  तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.  मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या या टीकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते वृत्त माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले,’दुर्घटना झाली की, घटनास्थळी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे.’

ते पुढे म्हणाले,’सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचं नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे’ असं म्हणत मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या या टीकेवर उत्तर दिल आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.