सरकारी भांडवल वाटपामुळे बँकांचे शेअर का वधारतात?

२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी आलेल्या बातमीनं दुसऱ्या दिवशी सरकारी बँकांच्या शेअर्सचं उखळ पांढरं झालं, खासकरून कॉर्पोरेशन बँक. सर्वच सरकारी बँकांचे शेअर्स हे ३ ते १९ % वरती गेले. यामागचं कारण म्हणजे सरकारनं ४८००० कोटी रुपये १२ बँकांना देण्याची योजना जाहीर केली, ज्यामुळं बँकांना भांडवली वाटपासाठी मदत मिळाली व ज्यामुळं कॉर्पोरेशन बँक व अलाहाबाद बँकेस प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन मधून बाहेर येण्यासाठी हातभार लागू शकतो.

एकदा का कोणतीही बँक नेमून दिलेल्या चौकटीबाहेर जाते, तेव्हा बँका थेट दिवाळखोर ठरू नयेत म्हणून रिझर्व्ह बँकेनं मूल्यांकनासाठी, देखरेखीसाठी, बँकांना ताब्यात ठेवण्यासाठी, बँकांवर देखरेख ठेवण्यासाठी एका चौकटीत काही गोष्टी नेमून दिलेल्या आहेत यालाच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन म्हणतात. ज्यामध्ये विविध टप्पे आहेत जसे की, लाभांशावर मर्यादा, प्रवर्तकांनी अधिक भांडवल आणण्यासाठी तगादा, शाखाविस्तारावर निर्बंध, जास्तीची तरतूद, व्यवस्थापन भरपाईवर अंकुश, इ. त्यामुळं सरकारी बँकांचे सर्वात मोठे प्रवर्तक असलेले सरकार अधिकचं भांडवल ओतत आहे म्हटल्यावर अशा बँकांना हायसे वाटणारच.

Leave A Reply

Your email address will not be published.