पवारांना बाबराच्या नावे मशीद बांधण्याची इच्छा का? – फडणवीसांचा सवाल

मुंबई – महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या ‘मशीद उभारणीसाठी ट्रस्ट स्थापण करावे’ या मागणीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ज्या बाबराने भारतावर आक्रमण केले त्याच्या नावे पवारांना मशीद का उभारावी वाटते? असा खोचक प्रश्न उपस्थित केला.

“बाबराने भारतावर आक्रमण केले होते. असं असताना देखील शरद पवारांच्या त्याच्या नावे मशीद उभारावी या इच्छेमागे काय कारण असावे? जर मुसलमानांना प्रार्थनेसाठी मशीद हवी असेल तर मशीद जरूर बांधावी मात्र भारतावर आक्रमण करणाऱ्या बाबराचे नाव मशिदीला कशासाठी द्यायचे” असा थेट प्रश्न विचारत फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ज्या प्रमाणे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापण्यात आले आहे त्याच धर्तीवर मशीद उभारणीसाठी देखील ट्रस्टची स्थापना करण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पवारांच्या या मागणीनंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पवारांच्या वक्तव्यावरून गदारोळाची शक्यता

महाराष्ट्रामध्ये उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत असून विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भाजपने सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्यासाठी चांगलीच तयारी केल्याचं दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासूनच महाविकास  आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी चहापानावर बहिष्कार, मराठा आंदोलकांची भेट अशा हालचाली केल्याचं पाहायला मिळालं.

शरद पवारांच्या उपस्थितीत ठरलं राष्ट्रवादीचं ‘मिशन उत्तरप्रदेश’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.