जेलसी किंवा मत्सर ही एक मनाची अवस्था असते, वृत्ती असते. दुसऱ्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यावर आनंद व्यक्त करण्याऐवजी मला त्या का मिळाल्या नाहीत असा विचार करुन दूषणे देणे म्हणजे जेलसी. बॉलीवूडसारख्या स्टारडम, ग्लॅमरच्या क्षेत्रात जेलसी पदोपदी दिसून येते. पण उघडपणाने हे मान्य कोणी करत नाही.
अभिनेत्री नीना गुप्ता मात्र याला अपवाद आहेत. वास्तविक, नीना यांनी आज वयाच्या या टप्प्यावर स्वतःला ज्या पद्धतीने मेंटेन ठेवले आहे त्याला खरेच तोड नाही. आजही त्या एखाद्या नवोदित नायिकेला टक्कर देऊ शकतात. पण तरीही नीना या नव्या नायिकांवर जळतात ! गंमत म्हणजे हे त्यांनीच मान्य केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बोलताना नीनांनी सांगितले की, मला आजही तितक्याच महत्त्वपूर्ण भूमिका करण्याची संधी मिळत आहे याबाबत मी खूप आनंदी आहे.
पण दुसरीकडे मी तरुण नसल्याचे दुःखही होते. मी तरुण असते तर आज माझ्याकडे कामासाठी अनेक पर्याय-व्यासपीठे उपलब्ध झाली असती. त्यामुळे मी या नवोदित नायिकांवर जळत असते. नीना गुप्ता या लवकरच “शुभ मंगल ज्यादा सावधान’ आणि “पंगा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी त्यांनी “बधाई हो’, “मुल्क’ आणि “वीरे दी वेडींग’मध्ये भूमिका केल्या होत्या.