नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास, मधुमेहाची शक्यता असल्यास, व्हिटॅमीन बी-12 ची कमतरता असल्यास, उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.
लिव्हरशी निगडित समस्या असल्यास, थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
याशिवाय फोलिक ऍसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही हा त्रास होतो किंवा मद्यपानाचे व्यसन असेल तर किंवा किडनी संबंधित आजार असतील अथवा एखाद्या किटकाचा दंश झाला तरी तळपाय किंवा हातांची सतत आग होत रहाते.
उपाययोजना…
1) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.
2)नस्य (नाकात दोन दोन थेंब सोडणे).
3) एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडित काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
4) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.
5) तुपाची तळपायांना मालिश व भीमसेन कापूर गरमपाण्यात घेतल्यास तत्काळ रिझल्ट येतो.
6) पायाला कोकम तेल लावायचा! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढऱ्या रंगाचे असून, सर्व साधारण खुप घट्ट असून खडूपेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध.
7) कोहळा, पाव किलो साल काढून, पांढरा दुधी पाव किलो साल काढून, आवळा गर पाव किलो, आलं 125 ग्रॅम साल काढून एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.
8) शतधौत घ्रुत पायाला लावत जा.
9) धनेजिरे पाणी पीत जा.