५० व्या इफ्फीमध्ये डायरेक्टर्स ऍक्टर या विशेष कार्यक्रमात शुक्रवारी (दि.२२) बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि नो एन्ट्री, वेलकम, सिंग इज किंग, वेलकम बॅक या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बाझमी या दोघांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. सिनेअभिनेत्री तिस्का चोप्रा हिने या दोघांची मुलाखत घेतली.
दरम्यान, यावेळी अनिल कपूर यांनी आपल्या फिटनेस बद्दलचे काही खुलासे केले. मी माझी फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी मध्यरात्री (२ वाजता) अर्धे बिस्कीट खातो. दिवसभरात देखील थोडे फार खात असतो. तसेच, अमीर खान देखील आपल्या फिटनेसाठी खूप मेहनत घेतो. असे अनिल कपूर म्हणाले.
यावेळी अनिल कपूर यांनी अभिनेता सलमान खान आणि आपल्या मैत्री बद्दलचे देखील काही खास किस्से सांगितले.