यावर्षी मकर संक्रांत 23 जानेवारी 2023 रोजी साजरी होत आहे. उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून लोक दान वगैरे करतात. त्यानंतर खिचडी, तिळ आणि गुळाचे लाडू दिले जातात. गुजरातेत पतंगबाजी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला तिळगुळ वाटले जाते. यानिमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करतात. तसे तर भारतीय रीतिरिवाजानुसार, कोणत्याही हिंदू सणात काळ्या वस्तू वापरण्यास मनाई आहे, परंतु मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात.
महिला काळ्या रंगाच्या साड्या नेसतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. पण हिंदू धर्मात जिथे सणाला काळा रंग अशुभ मानला जातो, तिथे मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात ? चला तर, जाणून घेऊया मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे कारण.
मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. ही परंपरा संपूर्ण भारतात नाही. फक्त आपल्या महाराष्ट्रातच मकर संक्रांतीचा सण साजरा करताना लोक काळे कपडे घालतात. देशातील उर्वरित शहरांमध्ये रंगीबेरंगी कपडे आणि बहुतांशी पिवळे कपडे घातले जातात.
मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तर दिशेने प्रवेश करतो. म्हणूनच असे मानले जाते की या दिवसापासून हिवाळा संपतो आणि शरद ऋतू सुरू होतो. याआधी हंगामातील सर्वात थंड दिवस असतात. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार काळ्या रंगाचे कपडे थंडीपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. म्हणूनच मकर संक्रांतीला लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.