मोदी आणि ठाकरेंनी लस का टोचून घेतली नाही?

प्रकाश आंबेडकरांनी केली सरकारवर खोचक टीका

नवी दिल्ली – करोना प्रतिबंधक लसीकरणाला देशात शनिवारी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी एक लाख 65 हजार 714 जणांचे लसीकरण करण्यात आले. देशभरात या लसीकरणासाठी 16 हजार 755 लसीकरण कर्मचारी कार्यरत होते.

लसीकरणानंतर दवाखान्यात दाखल करावे लागल्याची एकही घटना नोंदवली गेली नाही. तर दुसरीकडे आता लस घेण्यावरून विरोधी पक्ष नेते सरकारवर निशाणा साधत आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे  स्वत: लस का टोचून घेतली नाही? असा प्रश्न विचारत खोचक टोला लगावला आहे

पत्रकारांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर  म्हणाले,’मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?  पंतप्रधानांनी आणि ठाकरेंनी लसीकरणाचा  गाजा वाजा न करता कोविड लस स्वतः सिरींज भरून जनतेसमोर त्यामधील औषध टोचून घ्यावे. तेव्हाच जनतेला कोविड लसीबद्दल विश्वास निर्माण होईल.  असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला  आहे . 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.