तुम इतना जो घबरा रहे हो,क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो?- उमर खालीदचा मोदींना सवाल

नवी दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीवर उमर खालीदने टीका केली आहे. तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो?, असे ट्विट करत खालीदने मोदींवर निशाणा साधला असून पत्रकार परिषदेची ही कोणती पद्धत आहे. असा खोचक सवाल त्याने विचारला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली.  राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यानंतर आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीकांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर उमर खालीदनेही ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला. चेहरे पर पसीना, चुप्पी लबों पे, यह कैसा प्रेस कॉन्फ्रेंस चला रहे हो? असे ट्विट त्याने केले आहे. तुम्ही का इतकं घाबरलात ?,असं कोणतं पाप आहे की जे तुम्ही लपवत आहात?, असा सवालही त्याने विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.