मुंबई – गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “सत्यजीत तांबे हे निश्चित विजयी होणार, अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी मोठं काम केलं आहे. भाजपने त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा सत्यजित तांबे सन्मान ठेवतील हा विश्वास आहे. सत्यजीत तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार आहे’, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.