ब्रिटनने दोन डोसमधील अवधी का कमी केला ?

लंडन, दि. 15- भारतात करोनावर दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले असतानाच ब्रिटनने मात्र दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग आता त्या देशाने वाढवला आहे. त्यासाठीच ब्रिटनने करोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र केवळ 50 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी हा नियम लागू असल्याचे ब्रिटनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आधी दोन डोसमधील अंतर हे ब्रिटनमध्ये 12 आठवड्यांचे होते. ते आता कमी करण्यात येऊन 8 आठवडे एवढे करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, करोनापासून 50 वर्षावरील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लवकर दुसरा डोस देण्यात येईल. भारतातील करोना म्युटंटमुळे ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे त्यावर पंतप्रधानांनी चिंताही व्यक्त केली आहे. भारताने करोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवलेला असताना ब्रिटनने मात्र दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.