देशाचा लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉलचा 15वा सीझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 26 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता सुरू होत आहे. या सीझनच्या ऑडिशनपासूनच या सीझनबद्दलच्या चर्चेने वेग पकडला आहे. सृजन पोरैल एक जबरदस्त परफॉर्मर आहे, पण इकडे तो फक्त आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आलेला नाही, तर एका मिशनवर आला आहे! सृजनने अत्यंत आत्मविश्वासाने, ठामपणे जाहीर केले, “प्रेमसंबंध वाट बघू शकतात, माझे करियर नाही!”
सृजनने ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटातील ‘अलविदा’ गाणे इतके काही आवेगाने म्हटले की, सर्व परीक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्याच्या परफॉर्मन्सला त्याच्या एका अनुभवाची देखील जोड होती. पूर्वी आपला प्रेम-संबंध होता, पण ते नाते फिस्कटले असे त्याने सांगितले. तो गंमतीने म्हणाला, “रिलेशनशिपपेक्षा ती इंटर्नशिपच होती आणि त्याचा स्टायपेन्ड होता ‘धोका;” त्याने सांगितले आपल्या प्रेमभंगाच्या दुःखातून प्रेरणा घेऊन त्याने स्वतःची ‘NGO- नॉन-गर्लफ्रेंड ऑर्गनाइझेशन’ कशी सुरू केली आणि आपल्या मित्रांना त्यात सामील व्हायला सांगितले.
या NGO ची एक प्रतिज्ञा होती, जी सृजनने म्हणून दाखवली. “मी, सृजन परैल, अशी शपथ घेतो की, आजपासून कोणत्याही रिलेशनशिप किंवा प्रेमा-बिमाच्या फंदात मी पडणार नाही आणि माझ्यासोबत माझ्या मित्रांनाही त्याच्या पासून दूर ठेवेन. आमचे एकच काम असेल, आपल्या कारकीर्दीवर फोकस करणे, त्या व्यतिरिक्त काहीही नाही.”
त्याचे बोलणे ऐकून प्रभावित झालेल्या बादशाहने तर तत्काळ जाहीर करून टाकले, “तथास्तु! आणि मी देखील तुझ्या सोबत आहे.” त्यानेही अविवाहित राहून आपल्या कामाप्रति समर्पित राहण्याची शपथ घेतली. बादशाहच्या हातावरील टॅटू पाहून जेव्हा सृजनने टिप्पणी केली, तेव्हा बादशाह आपल्या शायराना ढंगात म्हणाला, “याद नहीं शरम तो आती होगी, झूठी ही सही कसम तो खाती होगी”.. “माझीही NGO आहे, पण त्या NGO मध्ये मी एकटाच आहे.”
पण, एक मुख्य प्रश्न हा राहतोच की, सृजनचा हृदयस्पर्शी आणि वेधक परफॉर्मन्स त्याला पुढच्या फेरीत घेऊन जाणार का? होतकरू गायक आणि अफाट लोकप्रियता यांच्यातील अंतर दूर करण्यासाठी येत आहे इंडियन आयडॉल, 26 ऑक्टोबरपासून, आणि दर शनिवारी-रविवारी रात्री 9 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल.