अभिनेता अजय देवगणने त्याच्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. या लिस्टमध्ये त्याचा फूल और काँटे हा सिनेमा प्रथम स्थानी येतो. या सिनेमाने अजय देवगणला ओळख मिळवून दिली. त्यानंतर बॅालीवूडमध्ये त्याच्या चित्रपटांची घौडदोड कायम राहिली.
त्याच काळात अजयला बर्फ नामक चित्रपटाची अॅाफर देण्यात आली होती. अजयलाही त्या सिनेमाची स्क्रिट आवडली होती. मात्र, त्याने सिनेमात अभिनय करण्यास नकार दिला. याबाबत आता हा चित्रपट बनवणारे अब्बास टायरवाला यांनी अजयने चित्रपटाला का नकार दिला होता याबाबत मोठा खुलासा केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्बास यांनी याबाबत खुलासा केला आहे. बर्फ नामक चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास टायरवाला आणि विशाल भारद्वाज एकत्र मिळून करणार होते. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकून अजय देवगण रोमांचित झाला, पण त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. ‘बर्फ’ हा चित्रपट भारत-पाकिस्तानवर आधारित प्रेमकथा होता. ज्यामध्ये मनोज बाजपेयी आणि सुष्मिता सेन यांच्या देखील प्रमुख भूमिका असणार होत्या.
तो काळ आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. हा चित्रपट माझ्यासाठी खूप रोमांचक प्रकल्प होता. विशालजी आणि मी खूप दिवस एकत्र येत या चित्रपटाचे लेखन केले होते. या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकण्यासाठी मनोज आणि सुष्मिताजी येणार होते. पण मनोज यांच्या आधी विशालने हा चित्रपट अजय देवगणकडे नेला. त्यातील पुरुष पात्र ही पाकिस्तानी मेजरची भूमिका होती.
त्या भूमिकेसाठीच अजयला विचारणा करण्यात होती. पण अजयने ही भूमिका करण्यास नका दिला. जेव्हा अजय देवगणने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा तो म्हणाले की, यापेक्षा सुंदर स्क्रिप्ट मी अनेक वर्षांपासून वाचलेली नाही. पण सध्या मी माझ्या करिअरच्या ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर पाकिस्तानी मेजरची भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड आहे.