स्वतःचा अपमान का करून घेत आहेस

अभिनेता कमाल खानचा धोनीला सवाल

मुंबई – महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या मिडास टचमध्ये नाही. त्यामुळे त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचेही जहाज सध्या आयपीएल स्पर्धेत हेलकावे खात आहे. भावा, इतक्‍या भूषणावह कारकिर्दीनंतर आता स्वतःचा अपमान का करून घेत आहेस, अशा शब्दांत अभिनेता कमाल आर. खान याने धोनीला विचारणा केली आहे. 

वयाची चाळीशी जवळ आलेली असताना धोनी स्वत:चाच अपमान का करून घेत आहे. अशी विचारणाही कमाल खानने केली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत धोनी खेळपट्टीवर होता. ज्या परिस्थितीतील सामने धोनी पूर्वी सहज जिंकून देत होता.

या सामन्यात मात्र, त्याला चौकार व षटकार मारताना धाप लागत होती. तसेच ज्या वेगाने तो धावा घेत असे तो वेग या सामन्यात दिसला नाही. धोनी या सामन्यात थकल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे धोनी आता संपला, असेही संदेश चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याचीच रि ओढत कमाल खानने धोनीला आता बास झाले आणखी अपमान करून घेऊ नकोस, असे सुचवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.