Chhaava Movie | ‘छावा’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका सर्वांच्या पसंतीस पडली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. छावा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा प्रभावित झाला आहे. त्यानंतर त्याने ट्ववीट करत काही प्रश्न विचारले आहेत.
आकाश चोप्रा यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘मी छावा चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखविताना ज्या निस्वार्थी वृत्तीचं दर्शन झालं, त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला गेला?’
Watched Chhaava today. Incredible tale of bravery, selflessness and the sense of duty.
Genuine question—why were we not taught about Chattrapati Sambhaji Maharaj at all in school? Not even a mention anywhere!!!
We did learn though how Akbar was a great and fair emperor, and…— Aakash Chopra (@cricketaakash) February 17, 2025
आकाश चोप्राने अकबर आणि औरंजेबासह इतर मुघल बादशहांना दिल्या गेलेल्या महत्त्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तो म्हणाला की, आम्हाला शिकवण्यात आलं की, अकबर एक महान आणि निष्पक्ष सम्राट होता आणि इथे दिल्लीमध्ये औरंगजेब रोड नावाचा एक मुख्य मार्गही होता. असं का घडलं? असा सवाल आकाश चोप्रा याने विचारला. त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.
दरम्यान, ‘छावा’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा दिग्गज लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कांदबरीवर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आतापर्यत या सिनेमाने १४० कोटींचा टप्पा पार केलाय. तर जगभरात सिनेमाची कमाई १६० कोटींच्या वर पोहचली आहे.
हेही वाचा:
भन्नाट ऑफर! फक्त 6 हजारात मिळतोय पोकोचा स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच