प्रभात वृत्तसंस्था – आपल्याला दररोज रस्त्यावर अनेक मॉडेल्सच्या गाड्या धावताना दिसतात. ज्यांचे रंग, मॉडेल, वैशिष्ट्ये देखील भिन्न असतात. या सगळ्यासह गाडीच्या नंबर प्लेटचे रंगदेखील वेगवेगळे दिसतात. या वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट्सचे देखील भिन्न अर्थ आहेत. रस्ते मंत्रालयाने वाहतुकीच्या वाहनांसाठी नंबर प्लेटचा रंग निश्चित केला आहे. यामागील अर्थ जाणून घेऊयात.
पांढरी नंबर प्लेट
खासगी वाहनांना पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट असते. ही नंबर प्लेट पांढर्या रंगात असते आणि त्यात काळ्या रंगाने आकडे लिहिलेले असतात. याचा अर्थ असा की या वाहनाचा व्यावसायिक वापर केला जात नाही. हे प्लेट खासगी वाहनाचे प्रतीक आहे.
पिवळी प्लेट
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट पाहून आपल्याला सहज समजते की ही एक टॅक्सी आहे. पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स सहसा ट्रक किंवा टॅक्सीमध्ये बसविल्या जातात. ही वाहने व्यावसायिक कारणांसाठी वापरली जातात. या प्लेटच्या आतही काळ्या रंगाने नंबर लिहिलेले असतात.
निळी नंबर प्लेट
परदेशी प्रतिनिधी वापरल्या जाणार्या वाहनांना निळी नंबर प्लेट देण्यात येते. या गाड्यांमधील निळी नंबर प्लेट आपल्याला सांगते की हे वाहन परदेशी दूतावास किंवा यूएन मिशनचे आहे. या निळ्या प्लेटवर पांढर्या रंगात नंबर लिहिलेले असतात.
काळी नंबर प्लेट
ब्लॅक-प्लेट कॅरीएजेस एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी असतात. या प्रकारची वाहने मोठ्या हॉटेलमध्ये उभी असल्याचे आढळून येईल. अशा मोटारींवर ब्लॅक नंबर प्लेट असते आणि त्यावर पिवळ्या रंगाचे नंबर लिहिलेले असतात.
लाल नंबर प्लेट
जर एखाद्या वाहनाच्या नंबर प्लेटचा रंग लाल असेल तर तो भारताच्या राष्ट्रपतींचा किंवा एखाद्या राज्याच्या राज्यपालांचा असेल. या प्लेटववरील अंक सोनेरी रंगात लिहिलेले असतातत आणि या गाड्यांमध्ये अशोकाच्या स्तंभाचे चिन्ह लाल नंबर प्लेटने बनविलेले असते.
एरो नंबर प्लेट
सैन्य वाहनांसाठी भिन्न क्रमांक प्रणाली वापरली जाते. अशा वाहनांचे क्रमांक संरक्षण मंत्रालयाकडून दिले जातात. अशा गाड्यांच्या नंबर प्लेटवर अंकांच्या पहिल्या किंवा तिसर्या अंकाच्या जागी वरच्या दिशेला बाण असतो, ज्यास ब्रॉड एरो म्हणतात. बाणानंतरचे पहिले दोन अंक सैन्याने ज्या वर्षी वाहन खरेदी केले त्या वर्षाचे दाखवते, ही संख्या 11 अंकी असते.
ग्रीन नंबर प्लेट
रस्ते मंत्रालयाने इलेक्ट्रिक परिवहन वाहनांसाठी ग्रीन नंबर प्लेटची स्थापना केली आहे. प्लेट हिरवी असते, परंतु त्यावरील आकड्याचा रंग वाहन खाजगी आहे की व्यावसायिक, हे दर्शवेल. ज्या वाहनावर हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाचे आकडे असतील ते वाहन खासगी इलेक्ट्रिक वाहनाच्या श्रेणीत येईल. आणि ज्या वाहनाच्या नंबरप्लेटच्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगाचे आकडे दिसतील ते व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन असतील.