#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी रोटेशन प्रमाणे पाणी सुटले आहे.
खोटे बोलणार्यांवर तालुक्यातील जनता विश्‍वास ठेवणार नाही.

नीलकंठ मोहिते/रेडा – इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी व अन्य तलावात पाणी सोडण्यासाठी कोणीही आदेश दिलेले नव्हते हे पाणी रोटेशन प्रमाणे सुटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुणे येथे जे आंदोलन झाले या आंदोलनाची दखल पालकमंत्र्यांनी घेतली होती,परंतु आत्ता आमच्या आदेशाने पाणी सुटले आहे असा गवगवा केला जातो. खोटे बोलण्याचा धंदा विरोधकांनी थांबवावा असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

तरंगवाडी तालुका इंदापूर तलावातील पाणी पूजन आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.बापूराव पोळ,तुकाराम करे,अतुल झगडे,अनिकेत वाघ,श्रीधर बाब्रस,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे,बाळासाहेब ढवळे,गजानन गवळी,स्वप्नील राऊत,धनंजय बाब्रस,वसंतराव आरडे यांच्यासह तरंगवाडी गोखळी वडापुरी झगडेवाडी या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.असा दुष्काळ 70 वर्षांपूर्वी देखील नव्हता परंतु जो दुष्काळ पडला आहे. तो दुष्काळ मी पाडलेला नाही ती निसर्गाची किमया आहे.तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझ्यासह शेतकऱ्यांना आंदोलन केल्यावरती शब्द दिला होता.दौंड तालुक्यातील पाण्याचे रोटेशन संपले,जानाई – शिरसाई येथील रोटेशन संपले त्यामुळेच तरंगवाडी तलावात पाणी आले आहे, गंगेच्या साक्षीने सांगतो रोटेशन प्रमाणे पाणी सुटले असतानादेखील विरोधक यामध्ये राजकारण करत आहेत ते चुकीचे आहे.त्यामुळे त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी असे खुले आवाहन आमदार भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता दिले.

कोणतेही रोटेशन बंद करून तरंगवाडी तलावात पाणी आलेले नाही,असे असताना देखील पाण्याचे खोटे राजकारण करून वेगळे भांडवल निर्माण विरोधक करत आहेत.मात्र यांच्या भूलथापांना वर जनता कधीही बळी पडणार नाही.जोपर्यंत उजनीचे पाणी शेतकऱ्यांना दिले जात नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार.उजनीतून तालुक्यातील पाझर तलाव भरले पाहिजेत ही अभिनव योजना राबवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे शेतीच्या पाण्यासाठी माझी मनापासून तळमळ आहे.ही तळमळ विरोधकांत कधीच नव्हती त्यामुळे खोटे बोलणार यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शेतकऱ्यांना आमदार भरणे यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी मी सांगितले अशी मोकळी शायनिंग करू नका असाही सल्ला आमदार भरणे यांनी विरोधकांना देत केवळ जानाई शिरसाई येथील पाण्याचे रोटेशन योजना चालू झाल्यामुळे एक महिन्याने आपणास उशिरा पाणी मिळते याचाही खुलासा आमदार भरणे यांनी स्पष्ट केला.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की,सण 93 94 95 या सालात उजनी धरणातून पाणी उचलून खडकवासला कॅनल मध्ये टाकून,निरा डाव्या कालव्यातून 65 गावांच्या शेतीचा पाणी प्रश्न निकाली करण्याची अभिनव योजना, मी त्या काळातील सरकारकडून मंजूर केलेली होती. त्या सरकारने या योजनेला मान्यता देऊन निधीदेखील वर्ग केला होता.सरकारकडे पैसा होता.त्या कालावधीत सीना माढा बोगदा नव्हता व कमी खर्चात योजना कार्यन्वित होणार होती.मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केवळ ही योजना जर कार्यान्वित झाली तर प्रदीप गारटकर तालुक्याचे आमदार होतील या भीतीपोटी मंजूर झालेली योजना हाणून पाडली असा आरोप प्रदीप गारटकर यांनी केला.

कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झाल्यानंतर यांची पहिली सभा सिंचन भवन पुणे येथे पार पडली व याच पार पडलेल्या सभेतील विषय क्रमांक पाच मध्ये उजनीतून इंदापूर तालुक्यातील तलावामध्ये पाणी सोडण्याची मंजुरी देण्यात आल्याची सर्व कागदपत्रे सर्व पुरावे आजही उपलब्ध आहेत.त्यामुळे तत्कालीन मंत्र्यांनी पाण्याच्या संदर्भात जनतेसमोर तोंड उघडण्याचा अधिकार नाही असा आरोप प्रदीप गारटकर यांनी केला. शासनाने मंजूर केलेली योजना जर झाली असती तर इंदापूर तालुक्यात आणखी चार साखर कारखाने चालले असते.मात्र हे पाणी अडवण्याचे पाप माजी मंत्री यांनी केले आहे.केवळ खुर्ची टिकवण्यासाठी हा खटाटोप केला आहे याचा पाढा तालुक्यातील गावोगावी वाचून दाखवणार असल्याचा सवाल प्रदीप गारटकर यांनी केला आहे.

1 COMMENT

  1. संपूर्ण पावसाळ्यात उजनी धरणातून भीमा नदीत सत्तर टीएमसी पाणी वाहून गेले तेव्हा का नाही कोरडे तलाव भरण्यासाठी पाणी सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)