मुंबई – दिया मिर्झा आणि बिजनेसमन वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.असे असतानाच अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारणही तसंच आहे. दिया लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
View this post on Instagram
दिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. सध्या दिया आणि वैभव रेखी अतिशय आनंदात आहे.
View this post on Instagram
दिया आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा खूपच कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या वर्षी करोनाच्या लॉकडाऊनच्या काळातच दिया आणि वैभव यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.
View this post on Instagram
वैभव रेखी हा प्रख्यात योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीचा पती होता. त्यांच्यात घटस्फोट होऊन गेला आहे आणि त्यांना एका मुलगी देखील आहे. तर दिया मिर्झानेही 2014 साली बॉयफ्रेंड साहिल संघाबरोबर लग्न केले होते. दियाने यापूर्वी “रहना है तेरे दिलमें’, “तुमको ना भुल पायेंगे’,”दम’,”दस’,”लगे रहो मुन्नाभाई’ आणि “संजू’मध्ये काम केले आहे. सर्वात शेवटी तिने “थप्पड’मध्ये काम केले होते.
View this post on Instagram