नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत छपाक, तान्हाजी याबरोबरच स्ट्रिट डान्सर, मलंग आदी चित्रपट श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. त्याचवेळी एकमेकांची स्पर्धाही पाहावयास मिळेल. या सहा महिन्यांत चित्रपटांचे आकलन केल्यास सध्या अक्षयकुमारने आघाडी घेतली आहे. सूर्यवंशी आणि लक्ष्मी बॉम्बसारखे चित्रपट त्याच्यासाठी ट्रम्प कार्ड असणार आहेत. नवीन जमान्यातील हिरो रणवीर सिंहचे पारडे देखील जड आहे. नायिकांमध्ये कंगना राणावत बाजी मारत असल्याचे चित्र आहे. पंगा आणि थलाइवी या चित्रपटानी तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. नवीन तारकांत कार्तिक आर्यन, सारा अली खान, जान्हवी कपूर चर्चेत आहे. परंतु अचानक एखादा कलाकार धूमकेतूप्रमाणे चमकला तर आश्चर्य वाटू नये.
नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात फेब्रुवारीत मलंग, इम्तियाज अलीचा अनाम, भूत-1 द हंटेड शिप, शुभ मंगल ज्यादा सावधान यासारखे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात सर्वात क्रेझ ही मलंग चित्रपटाची राहणार आहे. या चित्रपटातून अनिल कपूर पुन्हा एकदा पडद्यावर एंट्री करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरीचा देखील सध्या बोलबाला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय आदित्य राय कपूर, दिशा पटणी, कुणाल खेमू, अमृता खानविलकर यांचीही भूमिका “मलंग’मध्ये जबरदस्त असणार आहे. इम्तियाजचा अनाम चित्रपट आणि मलंग हा फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे. आजची हिट जोडी कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या अनामचे चाहत्यांना वेध लागले आहेत. सध्या त्याच्या प्रदर्शनाची तारीख व्हॅलेंटाइन डे ठेवली आहे. आयुष्मान खुराणाचा “शुभमंगल ज्यादा सावधान’ देखील चित्रपटागृहात दाखल होत आहे. हा आयुष्यमानचा हिट चित्रपट “शुभमंगल’चा सिक्वेल नाही. विशेष म्हणजे हा चित्रपट 21 फेब्रुवारीला रिलीज होत असून त्यादिवशी अन्य कोणताही चित्रपट झळकणार नाही.
“सूर्यवंशी’ची प्रतीक्षा
मार्च महिन्यात बागी-3, गुंजन सक्सेना, इंग्रजी मीडियम, सूर्यवंशीसह अर्धा डझनभर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. या महिन्याच्या प्रारंभी रिलीज होणारा बागी-3 चे मोठे आकर्षण टायगर श्रॉफ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर अहमद खान आहेत. आतापर्यंत बागी चित्रपटाच्या सर्व सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली आहे. याशिवाय हा महिना नवतारका जान्हवी कपूरसाठी देखील महत्त्वाचा आहे. तिचा बायोपिक बेस्ड गुंजन सक्सेना देखील याच महिन्यात रिलीज होत आहे. इंग्रजी मीडियमदेखील प्रदर्शनाच्या रांगेत आहे. दीर्घ आजाराचा सामना करून अभिनेता इरफान खान हा या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. प्रदर्शन कधी करावे, याचा घोळ राहिल्याने त्याची तारीख मागे-पुढे होत राहिली. शेवटी 27 मार्च ठेवण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील आता हिट मशिन बनले आहेत. या चित्रपटात कतरिनाचे काम एखाद्या शो पीसप्रमाणेच असेल, याच शंका नाही. याशिवाय अक्षयकुमारची आई म्हणून नीना यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे.
83 चा जलवा
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 83 प्रदर्शित होत आहे. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेवर बेतलेल्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी माजी कर्णधार कपिल देव निखंज यांना ठेवले आहे. कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंहने केली असून त्यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोनने केली आहे. 83 ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाशी अनेकांच्या भावनाही जोडल्या आहेत. कबीर खानचा 83 या चित्रपटातून याच भावनांचे प्रतिबिंब पाहावयास मिळणार आहे. दिग्दर्शक कबीर खानकडून बजरंगी भाईजानप्रमाणे चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. या महिन्यात अन्य उल्लेखनीय चित्रपटात रुहआफ्जा, गुलाबो सिताबो, चेहरे, लुटकेश, लूडो यांचा समावेश आहे. रुहआफ्जामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर असून गुलाबो सिताबोमध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना दिसणार आहेत. दिग्दर्शक सुजीत सरकार यांचा चित्रपट असल्याने सर्वांना गुलाबो सिताबोचे आकर्षण वाटत आहे. त्याचवेळी अमिताभ यांचा आणखी एक चित्रपट चेहरे देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी असणार आहे.
आयेगा राधे
मे महिन्यात कुली-1, दिल बेचारा, शकुंतला देवी, लक्ष्मी बॉम्ब, राधे आदी प्रदर्शित होणार आहेत. परंतु या महिन्यात बोलबाला राहील तो सलमान खानच्या राधे चित्रपटाचा. या महिन्याच्या शेवटी सलमानचा आणि प्रभुदेवा दिग्दर्शित राधे रिलीज होणार आहे. याशिवाय वरुण धवन-सारा अली खानचा कुली नंबर-1, सुशात सिंह राजपूतचा दिल बेचारा, विद्या बालनचा शकुंतला देवी आणि सर्वात वर लक्ष्मी बॉम्ब हे या महिन्यातील आकर्षण आहेत. ट्रेंड पंडित आमोद मेहरा यांच्या मते, या चित्रपटांचे वैशिष्ट्ये म्हणजे हे सर्व चित्रपट एकमेकांशी जोरदार स्पर्धा करणार आहेत. सलमानच्या “राधे’ला अक्षयकुमारच्या लक्ष्मी बॉम्बने चांगली टक्कर मिळेल, असे बोलले जात आहे.
जॉन आणि कंगनाचे आकर्षण
जून महिन्यात इंदू की जवानी, निकम्मा, खाली-पिली, मुंबई सागा, थलाइवी आदी चित्रपट रिलिज होणार आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती जॉन अब्राहमचा मुंबई सागा आणि कंगना राणावतचा थलाइवी या चित्रपटांची. जॉनचा मुंबई सागा हा अंडरवर्ल्ड बेस्ड आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता हा माफियावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जेव्हा जॉनच्या अभिनयाचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा त्याने आतापर्यंत एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावतच्या अभिनयाबाबत सर्वंच जण जाणून आहेत. थलाइवी या चित्रपटात तिच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू असणार आहे. या चित्रपटाची पटकथा दमदार आहे. थलाइवी हा जयललिता यांच्यावर आधारित आहे. यात एमजीआरची भूमिका रोजा आणि बॉम्बेसारख्या चित्रपटाचा नायक अरविंद स्वामी साकारत आहे.
लहान-मोठे चर्चेतील चेहरे
या सहा महिन्यात चित्रपटांचे आकलन केल्यास सध्या अक्षयकुमारने आघाडी घेतली आहे. सूर्यवंशी आणि लक्ष्मी बॉम्बसारखे चित्रपट त्याच्यासाठी ट्रम्प कार्ड असणार आहेत. नवीन जमान्यातील हिरो रणवीर सिंहचे पारडे देखील जड आहे. नायिकांमध्ये कंगना राणावत बाजी मारत असल्याचे चित्र आहे. पंगा आणि थलाइवी या चित्रपटाने तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. नवीन तारकांत कार्तिक आर्यन, सारा अली खान, जान्हवी कपूर चर्चेत आहे. परंतु अचानक एखादा कलाकार धूमकेतूप्रमाणे चमकला तर आश्चर्य वाटू नये.
दोन-दोन चित्रपटांची टक्कर
सिमला मिर्ची, तान्हाजी, छपाक यासारखे चित्रपट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झाले आहेत. सध्या नवीन वर्षाचा माहोल असल्याने तिकीटबारीवर चांगले कलेक्शन होत आहे. याच महिन्याच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला स्ट्रीट डान्सर, पंगा, छलांग, जवानी जानेमनसह आणखी काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार आहेत. छपाक, तान्हाजी हे मोठी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांत सध्या जोरात टक्कर सुरू आहे. पंगा आणि स्ट्रीट डान्सर 24 जानेवारीला रिलीज होत आहे. हे चारही चित्रपटाने वर्षभरातील बॉलीवूडचा मूड निश्चित होईल. ट्रेड विश्लेषक आमोद मेहरा म्हणतात, की 40 कोटींत तयार झालेला दीपिका पदूकोनचा “छपाक’च्या समोर अजय देवगणचा भव्यदिव्य दीडशे कोटींचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर आहे. दोन्ही चित्रपटाचे नेतृत्व दीपिका आणि अजय देवगण करत आहेत. या कारणामुळे श्रोत्यांत जबरदस्त क्रेझ पाहावयास मिळत आहे. हीच स्थिती पंगा आणि श्रद्धा-वरुण यांच्या स्ट्रीट डान्सरची आहे. अश्विनी अय्यर तिवारीच्या पंगा चित्रपटात एक कब्बडीपटू म्हणून कंगना राणावत श्रोत्यांसमोंर येत आहे. वास्तविक बरेली की बर्फीनंतर दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारीकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजासाठी स्ट्रीट डान्सर हा त्यांच्या मूडप्रमाणेच चित्रपट येत आहे.
सोनम परब