नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात घाऊक किमतीवर आधारित मागायचा दर किंचित कमी होऊन 13.56 टक्के इतका नोंदला गेला आहे. आगामी काळात तो आणखी कमी होईल या शक्यतेमुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदर वाढीची घाई करणार नाही असे समजले जात आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून घाऊक महागाईचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नोव्हेंबर महिन्यात या महागाईचा दर 14.23 टक्के होता. त्यामध्ये आता थोडी घट झाली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन आणि वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर जास्त पातळीवर आहेत.
याच कारणामुळे डाळी, गहू, तांदूळ इत्यादीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र बटाटे, कांदा, फळे आणि प्रोटिनयुक्त पदार्थाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ शेतीवर आधारीत महागाइची आकडेवारी जाहीर झाली आहे. ही महागाई वाढून 5.59 टक्क्यांवर गेली आहे.
रिझर्व्ह बॅंक आणि अर्थमंत्रालयाने ही महगाई चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला असला तरीही हा महागाईचा दर त्यापेक्षा जास्त आहे. यामुळे रिझर्व्ह बॅंक अगोदरच व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र भांडवलाचा वापर कायम राहावा याकरिता रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत व्याजदर वाढ टाळली आहे. आणखी दोन महिने तरी रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार नाही असे समजले जात आहे.