नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर कमी होऊन 12.96 टक्के इतका आज नोंदला गेला आहे. डिसेंबर महिन्यात या महागाईचा दर 13.56 टक्के इतका होता.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर 2.51 टक्के इतका होता. जानेवारी महिन्यामध्ये भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर उच्च पातळीवर आहे. प्रोटीनयुक्त पदार्थांचे दर वाढत आहेत. मात्र बटाटे आणि कांद्याचे दर जानेवारी महिन्यात कमी झाले.
इथून पुढे महागाईचा दर कमी होईल असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे आणि गेल्या आठवड्यात व्याजदर पुन्हा कमी पातळीवर ठेवले आहेत. सीआरसीएल या कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार डीआरई रेड्डी यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता आगामी काळात घाऊक महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.