कोणी असो वा नसो, सातारकर माझ्यासोबत

सातारा  -विकासकामांची शब्दपूर्ती हा आमचा स्थायीभाव आहे. काही ठिकाणी विकासकामांना वर्ष लागतात. कोणी सोबत असो वा नसो, सातारकर जनता माझ्यासोबत आहे, अशा कोपरखळ्या खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता मारल्या.

करंजे पेठेतील मेहेर कॉलनीत बगीचा, पोवई नाक्‍यावरील शिवस्मारक, पोवई नाका-वाढे फाटा रस्ता रुंदीकरण व अजिंक्‍यतारा किल्ल्याचा विकास आदी कामांचे भूमिपूजन खा. उदयनराजे यांच्या करण्यात आले. त्यावेळी उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. पालिकेत आ. शिवेंद्रसिंहराजे तुमच्यासोबत असणार का, असा प्रश्‍न विचारला असता, साताऱ्याची जनता माझ्यासोबत आहे.

आम्ही विकासकामांचा शब्द देतो आणि पाळतोही; परंतु काही लोक नुसतेच बोलतात आणि करत काहीच नाहीत, असा टोला उदयनराजेंनी लगावला. भाजप नेत्यांवर त्यांच्या कुवतीप्रमाणे सव्वा रुपयाचा दावा लावणार, असा टोला

शिवसेनेच्या खा. संजय राऊत यांनी लगावला होता. त्याबाबत छेडले असता, उदयनराजे म्हणाले, आपण हा प्रश्‍न संयमाने विचारल्याबद्दल आपले बुके देऊन कौतुक करू. शिवस्मारक आणि अजिंक्‍यतारा किल्ल्याचा विकास व प्रस्तावित रोप वे, पोवई नाका-वाढे फाटा रस्ता रुंदीकरण या कामांचे तपशीलवार अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, नगरसेवक राजू भोसले, साविआचे नगरसेवक, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त उदयनराजेंनी रयत शिक्षण संस्थेच्या आवारात कर्मवीरांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.