विरोधकांचेही राक्षसीकरण करू नका हे मोदींना कोण सांगणार?

कपिल सिब्बल यांचा सवाल
नवी दिल्ली: मोदींना राक्षस ठरवून भागणार नाही असे विधान जयराम रमेश यांनी केले होते त्यावरून निर्माण झालेली चर्चा अजून सुरूच आहे. त्यावर आता कपिल सिब्बल यांनीही उडी घेतली आहे. विरोधकांचेही राक्षसीकरण करणे योंग्य नाही हे भाजपच्या लोकांनी मोदींना अजून पर्यंत एकदाही का सांगितले नाही असा सवाल सिब्बल यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की कोणता भाजपचा नेता ठामपणे उभा राहिला आणि मोदींना म्हणाला की विरोधी पक्ष किंवा विरोधी नेत्यांचेही राक्षसीकरण करणे योग्य नाही?. जयराम रमेश यांचे विधान प्रसिद्ध झाल्यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले होते की मोदींना राक्षस असे संबोधण्यात आम्ही कधीच पाठिंबा दिला नव्हता किंवा आम्ही या आधीही त्यांना राक्षस संबोधण्याचे समर्थन केलेले नाही. पण आता कपिल सिब्बल यांनीही भाजपच्या नेत्यांना यावरून सवाल विचारल्यानंतर भाजपकडून यावर काय प्रतिक्रीया येते ते पहाणे औत्स्क्‍युचे ठरले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×