न्यूयॉर्क – बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर हे देखील न्यूयॉर्कमध्ये आहेत. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात ’29 सप्टेंबर’ रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. यानंतर अनेक बॉलिवूड स्टार त्यांना भेटायला गेले आणि अनेकजण सातत्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असतात. आता या जवळच्या व्यक्तींमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनच्या नावाचाही समावेश झाला आहे.
She is the famous actor from Pakistan,Mawra Hocane (left) and her friend Khatija. Sweet of them to visit us https://t.co/YM1tztOyQ6
— Rishi Kapoor (@chintskap) June 14, 2019
मावरा खास ऋषी यांना भेटायला त्यांच्या न्यूयॉर्कमधील राहत्या घरी गेली. ऋषी यांनी स्वतः सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. मावरासोबत फोटो शेअर करताना ऋषी यांनी लिहिले की, ‘ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री मावरा हेकेन (उजवीकडे) आणि तिची मैत्रीण खातिजा आहे. दोघी फार गोड मुली आहेत.’ ऋषी यांच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत.
एका युझरने लिहिले की, ‘युएसमध्ये इंडो- पाक भेट.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘ही अभिनेत्री एवढी प्रसिद्ध आहे की तुम्हाला तिच्या नावाचा उल्लेख करावा लागला. फारच छान. ही आहे तरी कोण? आम्ही फक्त तुम्हाला ओळखतो.’ यासारखे संमिश्र कमेंट ऋषी यांचे चाहते या फोटोवर देत आहेत. काही चाहत्यांनी ऋषी यांना लवकर बरे होऊन मायदेशात येण्याच्या शुभेच्छा दिल्या.