येणाऱ्या दहा वर्षात कोण जास्त पैसा कमावणार ? (भाग-२)

येणाऱ्या दहा वर्षात कोण जास्त पैसा कमावणार ? (भाग-१)

जर एखाद्या गुंतवणूकदाराने २००९ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रु. १,००,००० एका वर्षाच्या मुदतीसाठी गुंतवले असते तर त्याला एका वर्षाचे सात टक्के व्याज मिळाले असते. जे आज ६ टक्के झाले आहे. परंतु हेच १,००,००० रुपये बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवले असते तर रूपये १८० भावाने एका शेअरची खरेदी करता आली असती. आज सप्टेंबर अखेर या शेअरचा भाव २८० रुपये आहे.

म्हणजेच जर रू. १,००,००० हे२००९ मध्ये स्टेट बँकेच्या वार्षिक ठेवीत ठेवले असते व ७ टक्के वार्षिक व्याज दर गृहित धरला तर पुढील दहा वर्षात त्याचे एकूण २,००,४८९ झाले असते. परंतु जर गुंतवणूकदाराने याच रकमेतून स्टेट बँकेचे शेअर घेतले असते तर रु. १,००,००० मध्ये त्याला  ५५५ शेअर्स मिळाले असते. (सप्टेंबर २००९ रोजी प्रतिशेअर रु. १८० उपलब्ध होता.)

* २०१४ साली स्टेट बँकेच्या एका शेअरचे दहा शेअरमध्ये विभाजन झाले –

त्यामुळे  या गुंतवणूकदाराकडे  २०१४ पासून ५५० गुणिले १० म्हणजे स्टेट बँकेचे  ५५५० शेअर झाले. सप्टेंबर २०१९ अखेरीस ५५५० शेअरचा भाव २८० प्रतिशेअरप्रमाणे रु. १५,४०,००० झाला. याचाच अर्थ ज्या गुंतवणूकदाराने स्टेट बँकेत ठेव ठेवण्यापेक्षा त्या रकमेचे शेअर घेतले असते तर मागील दहा वर्षात जवळपास ठेवीवरील परताव्याच्या तुलनेत आठपट जास्त पैसे कमावता आले असते. (ठेवीची रक्कम दहा वर्षात दुप्पट झाली. परंतु याच काळात शेअरमधील गुंतवणुकीचा परतावा सोळापट झाला.) यालाच आपण संपत्ती निर्मिती असे संबोधतो.

Leave A Reply

Your email address will not be published.