मुंबई – रणवीर सिंह आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत होता. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली होती. मात्र, आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत काही प्रमाणात नाराजी पसरली आहे.
दरम्यान, या सगळ्या वातवरणात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या बहिणीने उडी मारली आहे. रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून ‘गली बॉय’ चित्रपटावर निशाणा साधला आहे.
रंगोली म्हणाली कि, “हा चित्रपट 8 Mile या हॉलिवूडपटावर आधारित असल्याचं सांगत, गली बॉय म्हणजे एका हॉलिवूडपचटाची नक्कलच आहे. या शिवाय उरी आणि मणिकर्णिका या चित्रपटांशी तुलना करत हा चित्रपट मुळ कथेवर आधारलेला नसल्याचं,” तिने म्हंटलं आहे.
This film is based on Hollywood film 8 Mile, yahan ke movie mafia chatukar critics ke chaatne se kya hota hai, it’s not original content like Uri and Manikarnika, why Hollywood will give award to a film which is copied from their film ? pic.twitter.com/vSVeVHVaUB
— Rangoli Chandel (@Rangoli_A) December 17, 2019