नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर सर्वांच्या नजरा भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. सध्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, अशा चर्चांना ऊत आला आहे.
लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यानुसार अमित शहा यांच्याकडे महत्वाची जबादारी सोपविण्यात येणार असल्याचा चर्चा आहेत. भाजपा ‘एक व्यक्ति- एक पद’ या सिद्धांतावर काम करत असल्याने अमित शहा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास त्यांना अध्यक्ष पद सोडावे लागेल. अमित शहा त्यांच्याजागी भाजप अध्यक्ष पदासाठी जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद सांभाळले नाही तर अर्थमंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविली जाईल.