नगर: धारदार पाते असलेला एक फुट लांबीचा चाकू बाळगून संशयितरित्या वावरणाऱ्या संकेत कासम चव्हाण (वय-27 रा. मिलन हॉटेलसमोर, सर्जेपुरा) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा रूग्णालय परिसरात करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार अनिल भोसले यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.न पुढील तपास घोरपडे करत आहे.