राहुल गांधी यांनी उपस्थित केला सवाल
नवी दिल्ली: सीएए अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान अल्पवयीन तरुणाने गोळीबार केल्याचा मुद्दा कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याला कोणी पैसा पुरवला?, असा सवाल संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी केला.
जामिया परिसरात 17 वर्षीय या तरुणाने गुरूवारी दुपारी आंदोलकांकडे बंदूक रोखली होती. त्यानंतर त्याने गोळीबारही केला होता. तो सातत्यांनं यह लो आझादी असं म्हणत होता. देश में जो रहेना होगा, वंदे मातरम् कहना होगा आणि दिल्ली पोलीस जिंदाबाद अशा घोषणाही तो तरूण गोळीबार करण्याआधी देत होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा उपस्थित केला आहे.